शबनम न्युज | पिंपरी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहरातील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रतीक्षा लक्ष्मण घुले यांची पुणे जिल्हा युती प्रमुख पदी सार्थ निवड करण्यात आली आहे.
युवा सेनेने सचिव वरून सरदेसाई यांनी युवा सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठविलेल्या पत्रकार द्वारे ही माहिती कळविली आहे सदर नियुक्त तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पादरीकारांचे काम बघून कायम करण्यात येतील असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना प्रतीक्षा घुले म्हणाल्या कि,समाजातील तळागाळातील लोकांचे निस्वार्थ पणे काम करणार्या बोपखेलच्या सर्वसामान्य कुटुंबातील, राजकारणाची कोणतीही पार्श्वभुमी नसणार्या सर्वसामान्य शिवसैनिकास जिल्हा पातळींवर काम करण्याची संधी पक्षनेतृत्वाने दिला आहे, येणार्या पुढील काळात अधिक जोमाने काम करणार असे प्रतिक्षा घुले यांनी ह्यावेळी म्हणले आहे.