शबनम न्युज | मुंबई
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केला आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला, की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचच शपधविधी होईल,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
Advertisement
Advertisement