शबनम न्युज | पुणे
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ‘ गुरू स्पर्श ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायन तसेच सरोद व तबला जुगलबंदीतून गुरूंना वंदन करण्यात आले.गायिका उर्वशी शहा, तबलावादक आशिष पॉल, सरोदवादक पं. पार्थो सारथी आणि हार्मोनिअम वादक सौमित्र क्षीरसागर हे सहभागी झाले होते.
उर्वशी शहा यांच्या गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मिया की मल्हार या रागाने सुरुवात केली . त्यानंतर त्यांनी तराना सादर केला . राग देस मधील ठुमरी सादर करून रसिकांची मने जिंकली.पंडीत पार्थो सारथी यांनी सरोद वर राग मेघ ने सुरुवात केली. त्यानंतर राग जय जयवंती सादर केला. आशिष पॉल यांनी तबल्यावर सुरेल साथ दिली. सरोद वादन आणि तबल्याच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले.
हा कार्यक्रम शुक्रवार, १५ जुलै रोजी २०२२ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला. हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२९ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. छाब्रिया नर्सरी स्कूलच्या मुख्याध्यापिका अपर्णा दास यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.