शबनम न्युज | पुणे
शहरात मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. रात्रभर झालेल्या पावसामुळे तेरा ठिकाणी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
दत्तवाडी पोलीस चौकीजवळ, शिवणे परिसरातील शिंदे पूल, विश्रांतवाडी भागातील टिंगरेनगर गल्ली क्रमांक ६, लुल्लानगर, भवानी पेठेतील महापालिका वसाहत, ओैंधमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४, नवीन शासकीय विश्रामगृहाजवळ, नाना पेठेतील अशोक चौक, आळंदी रस्त्यावरील कळस गावातील जाधव वस्ती, हडपसरमधील क्वालिटी बेकरीजवळ, कोथरुडमधील मयूर काॅलनी, एरंडवणे भागातील गुळवणी महाराज पथ परिसरात झाडे पडली.
Advertisement