मुसळधार पाऊस धरण पातळीत झालेली वाढ पाहता पिंपरी चिंचवड शहरात होणारा दिवसाआड पाणीपुरवठा नियमित सुरू करण्याची माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी | शबनम न्यूज
पवना धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे बारा तासात धरण साठ्यात ७.३० टक्के वाढ झाली आहे.
पवना धरणातील पाणीसाठा आज रोजी ४९.४८ टक्के इतका आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे व त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
Advertisement
धो-धो पडणारा मुसळधार पाऊस, वाढलेली धरणाची पातळी पाहता दिवसाआड होणारा पाणीपुरवठा रद्द करून नियमित सुरू करावा अशी मागणी निवेदनद्वारे माजी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्तांकडे केली आहे.