शबनम न्युज | मुंबई
आज अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार सोबत हातमिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री बनल्याने महाराष्ट्रातील जनतेला धक्का बसला आहे. दरम्यान, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच आपल्या ट्विटर बायोमध्ये बदल केला आहे.
Advertisement
अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरबायो मध्ये बदल केला. “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामती येथून विधानसभेचे सदस्य, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते,” असा बदल त्यांनी केला आहे.