शबनम न्युज | मुंबई
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावरील सुनावणीसंदर्भात शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर सुनावणी झाली. यानंतर उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “आठ ऑगस्टला सुनावणी आहे. जे वृत्तवाहिन्यांवरुन दाखवण्यात आलं त्यात स्पष्ट असं सांगितलं आहे की निवडणूक आयोगाकडे जी सुनावणी सुरु आहे त्याला कुठं सर्वोच्च न्यायालयाने आडकाठी केली असं मला वाटत नाही,” असं मत उदय सामंत यांनी नोंदवलं आहे. “मात्र निर्णयापर्यंत येऊ नये अशापद्धतीची भूमिका न्यायालयाने मांडली आहे,” असंही सामंत म्हणालेत.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, सोमवारी हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही याबद्दल निर्णय होणार असल्याचे न्यायालयाने सांगितल्याचंही नमूद केलं. “हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे द्यायचं की नाही याचा निर्णय सोमवारी घेणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. ही महत्वाची गोष्ट आहे,” असं सामंत म्हणाले.