दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील माजी नगरसेविका माजी शिक्षण समिती सभापती मनीषा पवार व श्री शिवछत्रपती शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सदर सोहळयाचे आमदार लक्ष्मण जगताप ,चिंचवड विधानसभेचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजपचे शहर उपाध्यक्ष काळूराम बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते, यावेळी सामाजिक कार्यकर्ते सनी बारणे ,माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे, सामाजिक कार्यकर्त्या करिश्मा बारणे ,वाकड पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
थेरगाव मध्ये महिलांनी डोळे बांधून काठीने दहीहंडी फोडणे या स्पर्धेचा परिसरातील महिलांनी मनमुरात आनंद लुटला या स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी, सोन्याची नथ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या 180 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
महिलांच्या दहीहंडीमध्ये विजेत्या असलेल्या उमा आगलावे, ज्योती गणसरे, रोहिणी रणसिंगे, कोमल यादव, उर्मिला अडसुळे ,आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी श्री शिव छत्रपती शिवाजी मित्र मंडळ चे अध्यक्ष विनोद पवार यांच्यासह दिगंबर पवार, संभाजी आरसुळे, प्रशांत नाटेकर ,प्रेम पवार ,सनी डोळस ,रोहित शिवशरण, विशाल गायकवाड, लक्ष्मण भंडारे ,सुमित बनसोडे, विशाल चांदोलकर, अर्जुन जाधव ,शाम केदारी, आकाश शेलार, सौरभ रोकडे, मंजू कांबळे ,रोहिदास भालेकर शिरनो कांबळे ,आकाश कांबळे ,हार्दिक यादव, शोएब शेख, सागर वाघमारे आकाश गायकवाड, विनू कांबळे, मिलिंद चव्हाण, सिद्धू कांबळे ,प्रकाश देवनगाव ,प्रज्वल साबळे ,कुणाल सोनवणे,अनिल सूर्यवंशी, दीपक देवकाते यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले तर प्रशांत गाडेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या सोहळ्यात सर्व उपस्थितितांचे आभार मंडळाचे संस्थापक प्रमोद पवार यांनी मानले