शबनम न्युज | पिंपरी
संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे चालू मेट्रोमध्ये प्लॅटफॉर्मवर प्रथमच दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आयोजित श्री गणरायाच्या आगमनाची तयारी संत तुकाराम नगर मेट्रो रेल्वे स्टेशनवर ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे ढोल ताशा पथकाचा चालू मेट्रोमध्ये आणि मेट्रो स्टेशनवर वादनाचा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी संत तुकाराम नगर येथील भद्राय पथकाने आपल्या पथकाची कला सादर केली या पथकामध्ये १०० ते १५० तरुण-तरुणींनी सहभाग घेऊन पिंपरी चिंचवड मध्ये श्री गणेशाच्या आगमनाची चाहूल पिंपरी चिंचवड करांना दिली ती सुद्धा चालत्या मेट्रोत, हा वेगळा उपक्रम घेण्यासाठी दुर्गा ब्रिगेड संघटना अध्यक्ष दुर्गा भोर यांनी पुढाकार घेतला असून, दुर्गा ब्रिगेडचे अनेक सदस्य यामध्ये सामील होते. पुढील काळात दुर्गा ब्रिगेडतर्फे अनेक अभिनव उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दुर्गा भोर यांनी दिली.
यावेळी मेट्रोचे मनोज डॅनियल, शुभम दळवी आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेट्रोमध्ये ढोल ताशा पथकामुळे मेट्रो स्टेशन मध्ये आणि मेट्रोच्या प्रवाशांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्ताने मेट्रो चे ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विनय गजरमल ,नंदकिशोर अडेटला, दीपक गोरे भद्राय ढोल ताशा पथकाचे प्रमुख उपस्थित होते.