शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
शिक्षक दिनानिमित्त मधुकर बच्चे युवा मंच वतीने पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय केशवनगर चिंचवड येथील शिक्षकांचा शाल,गुलाब,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .
केशवनगर शाळेमधील मुख्याध्यापक मा.रामदास चपटे सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व शिक्षक वृंद विध्यार्थ्यांना अतिशय उत्तम शिक्षण देतात तसेच त्यांचे भविष्य योग्य दिशेने असावे यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना खूप मनापासून मदत करतात असे मत महाराष्ट्र महावीतर समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य, भाजपा शहर सचिव:मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने शिक्षक दिन उपक्रम घेण्यात आला. शैलेश गोरे,गणेश बच्चे,आदींनी सहभाग घेतला. मधुकर बच्चे यांनी शिक्षकांचा सन्मान केल्याबद्दल विद्यालयचे मुख्याध्यापक मा.रामदास चपटे यांनी मधुकर बच्चे सह आलेल्या सर्वांचे आभार मानले.