शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात सध्या गणेशोत्सवाचं प्रचंड उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. मोशी परिसरातील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे चेअरमन व वैदिक विस्डम एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा/ राजेश दत्तात्रय सस्ते हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात मागील तीन ते चार दिवसांपासून मोशी परिसरातील विविध गणेश मंडळांना भेटी देत आहेत व गणरायाची आरती करून युवकांना मार्गदर्शन व भविष्यकाळात उज्वल भविष्यासाठी जीवन कसे जगावे. समृद्धीच्या मार्गावर कसे जावे. याचे मार्गदर्शन करताना आपला परिसर व आपला शहर कसा सक्षम व्हावा, यासाठी जनजागृती करत आहेत. कालच त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात गणेश विसर्जन हे विसर्जन कुंडातच करावे असे आवाहन केले, तसेच अनेक गणेश मंडळांना देणगी देण्यात येत आहेत.
मागील वीस पंचवीस वर्षापासून सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत राजेश सस्ते यांनी आपली एक वेगळी ओळख मोशी परिसरात निर्माण केली आहे.
राजेश सस्ते हे भेटी देत असलेल्या गणेश मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार सन्मान मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अर्चना सस्ते यांच्याही हस्ते गणरायाची आरती अनेक गणेश मंडळात होत आहे. यशस्वी विद्यालय आदर्शनगर मोशी ,नक्षात्र आय लँड सोसायटी मोशी,झंकार तरुण मंडळ शिवाजीवाडी ,शंभूराजे प्रतिष्ठान राधाकृष्ण नगर मोशी,फ्लॉवर सिटी सोसायटी इंद्रायणी पार्क मोशी , परायसो सोसायटी फेज 1 , 2 मोशी,तरुण मराठा मंडळ सस्तेवाडी मोशी,संत सावतामाळी तरुण मंडळ मोशी , नवरात्र मित्रमंडळ या गणेश मंडळांना आज भेटी देण्यात आल्या या संपूर्ण गणेश उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राजेश सस्ते व अर्चना सस्ते यांच्या माध्यमातून राबविले जात आहेत.