शबनम न्युज | पुणे
आदर्श बाल विकास उच्च प्राथमिक शाळा गांधीनगर जालना या शाळेमध्ये सच्ची प्रीत ट्रस्ट पुणे यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात आला. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष सचिन खंदारे व सदस्य श्रीमती सुचिता नवगिरी तसेच शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती संगीताबाई खंदारे या होत्या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली . यावेळेस विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यावेळेस संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक्स, कलर्स ,sport Tshirt आणि फळ वाटप करून लेकरांचा आनंद द्विगुणित करण्यात आला यावेळेस लेकरांनी आनंदाने कार्यक्रम सादर केले व आनंद लुटला.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती उगले बाई यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती कुहिरे बाई यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ढाकणे सर, श्रीमती एस्थेर बाई, वैशाली बाई यांनी श्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.