शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता विभागीय आयुक्तालय पुणे, तसेच प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी दिली आहे.
सदर रोजगार मेळावा रविवार (दि. ४) डिसेंबर रोजी सकाळी ९ दुपारी चार वाजेपर्यंत ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’ समर्थ नगर, नवी सांगवी, पुणे २७ येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच या रोजगार मेळाव्यात सहभागी उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी सातवी ते पदव्युत्तर. आयटीआय. इंजिनियर अशी शैक्षणिक पात्रता असणार असून उमेदवारांनी नाव नोंदणीसाठी डॉ. गणेश अंबिके ९४ २२ ०३ ६६ ३९ ,विशाल डोंगरे ८४ २१ ९० ४८ ५५ तसेच हेल्पलाइन क्रमांक ७५ ७५ ९८ ११ ११ या क्रमांक वर संपर्क करण्याचे आवाहन शेखर चिंचवडे यांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच या रोजगार मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही शेखर चिंचवडे आणि आयोजकांवतीने वतीने करण्यात आले आहे.