लोकनेते राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नाना काटे सोशल फाऊंडेशन व एक्सप्रेस क्लिनिक यांच्या वतीने दि. 12/12/2022 रोजी महादेव मंदीर सभागृह पिंपळे सौदागर येथे रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी मोफत न्युरोथेरेपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरावेळी सांधेदुखी, पाठीच्या समस्या, ॲसिडीटी,मायग्रेन ,पोटाच्या समस्या ,नैराश्य ,चिंता ,ए.व्ही.एन. इत्यादी आजाराविषयीच्या उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर हांडे आणि शिवसेवा शंभो मंडळाचे अध्यक्ष श्री. संपत मेटे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या दिर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या. एक्सप्रेस क्लिनिकचे डॉ. उमेश कदम यांनी न्यूरोथेरपी विषयी माहिती सांगितली. यावेळी ,विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे अध्यक्ष श्री. गणेश काटे ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. उत्तम धनवटे, श्री. अर्जुन काटे ,श्री. ज्ञानेश्वर काटे, हभप विलास काटे ,श्री. दिलीप काटे ,उद्योजक श्री. गोविंद काटे ,श्री. शंकर काटे ,श्री. शिवाजी काटे ,श्री. संदिप जगताप,श्री. भुंडे ,तसेच शिव शंभो सेवा मंडळाचे सभासद परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.racing okbet
okbet tennis