पूर्णचंद्र स्वाईन यांच्या वतीने सामाजिक उपक्रम
पिंपरी चिंचवड : ( शबनम न्यूज प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात संपन्न झाला. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले गेले, राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले, याच धरतीवर राष्ट्रवादीचे ख्रिश्चन विंग चे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष पूर्णचंद्र स्वाईन यांनीही शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब कुटुंबांना अन्नधान्य किट तसेच फळे वाटप व अन्नदान हा भव्य उपक्रम राबविला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचा अनेक गरीब कुटुंबांना लाभ मिळाला. सदर उपक्रम युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट , डॉ. बेक कंपनी जवळ, कामगार नगर , पिंपरी येथे संपन्न झाला. यावेळी दोनशे ते तीनशे कुटुंबांना अन्नधान्य किट, फळे वाटप व अन्नदान करण्यात आले या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे युवकचे शहराध्यक्ष इमरान भाई शेख व दीपक साकोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. OKBET/a>
सदर सामाजिक उपक्रम संपन्न होत असताना चंद्रपूर्ण स्वाईन यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त करत शरद पवार यांचे विचार हे तळागाळातील व्यक्तींना लाभ मिळावा व तळागाळातील व्यक्तींचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रेरित करतात त्यांच्या या प्रेरणेनेच आपण हा सामाजिक उपक्रम राबविला आहे तसेच यापुढेही असेच सामाजिक उपक्रम आपण सुरूच ठेवणार आहोत असे यावेळी चंद्रपूर्ण स्वाईन यांनी सांगितले. यावेळी या उपक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्वांचेच स्वाईन यांनी आभार व्यक्त केले.