शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मा. स्वीकृत सदस्य संदीप काशिनाथ गाडे व थेरगाव रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी करण्यात आली.तसेच रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम स्वच्छता अभियान राबविताना पवार नगर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व आजूबाजूचा कचरा गोळा करण्यात आला व पवार नगर थेरगाव मधील नागरिकांना स्वच्छतेबद्दलचे महत्त्व पटवून देण्यात आले.
आरोग्य शिबिरामध्ये रक्तदान घेण्यात आले. अनेक नागरिकांनी रक्तदान केले. नेत्र तपासणीमध्ये मोतीबिंद व डोळे चेकअप करण्यात आले. त्याचाही अनेक नागरिकांनी लाभ घेतला. डॉ.तानाजी कटके यांनी अनेक नागरिकांची दंतचकित्सा करून दिली. त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. श्रद्धा लायब्ररीतर्फे डॉ.छाजेड यांनीही नागरिकांची शुगर चेक करून दिली .
या कार्यक्रमासाठी थेरगाव मधले सर्व नागरिक थेरगाव रोटरी क्लब चे सर्व सदस्य भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष काळूराम बारणे, मा. नगरसेवक अभिषेक बारणे, मा. नगरसेविका मनिषा ताई पवार, युवा नेते तानाजी भाऊ, बारणे, नरेंद्रजी माने, संजय गांधी, योजना अध्यक्ष चिंचवड विधानसभा, प्रमोद भाऊ पवार रोटेरियन सुनील जगताप, दत्ता कसाळे, किशोर सकुंडे लक्ष्मण खांडे, सूर्यकांत कसाळे भरत शिंदे तानाजी भोसले, विनोद पाटील विजय भुसारे, देवा खाटपे, घारे साहेब, रोटेरियन एजी तारक साहेब, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद राजे भोसले, राकेश भानुसे, बजरंग नाना पवार, भरत पवार, चंद्रकांत कसाळे, राम दौंडकर, रोहिदास पवार,अमित सरोदे,बाळासाहेब जगताप,गणेश गांधी, प्रदीप पिसाळ, पवार नगर मधील सर्व मुले भास्कर उर्फ जिगर धनगुडे , साहिल भोसले, राजू मातेरे,प्रतीक दळवी ईश्वर मोरे, प्रमोद भोसे, मनीष दुबे, सचिन वंजारी,नाना शेडगे, अतुल घोगरे, हनुमंत बारणे, संदीप भाऊ आमले, शंकर खांडगे,स्वप्निल यादव, यश जगताप,आर्यन गाडे प्रथमेश आंबोळगे, सार्थक हेगडे,साईनाथ हेगडे, आकाश जणके दीपक जनके,सुजल कांबळे, अक्षय शेलार , स्वच्छता अभियानासाठी विशेष आभार पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग व त्यांचे कर्मचारी यांचे संदीप गाडे यांनी आभार व्यक्त केले.