पिंपरी चिंचवड : (शबनम न्यूज प्रतिनिधी)
आळंदी: श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव या ठिकाणी क्रीडा विभागाच्या वतीने मा.ना.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विकास दिघे यांनी केले.
या प्रसंगी ब्लिस हॉस्पिटलचे डॉ. राहुल साबळे यांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम,आहार आणि नियोजनाची कशी गरज आहे. या संदर्भात मत व्यक्त करीत जीवनात प्रत्येक रुग्णाच्या मदतीला तरुण वर्गाने सतत धावून गेले पाहिजे जेणेकरून आपला जन्म यशस्वी झाला असे समजावे असे मत व्यक्त करीत आरोग्यदायी आयुष्यासाठी विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी माणसाचा जन्म कसा महत्त्वपूर्ण असून प्रत्येकाने अडीअडचणीवर मात करून आपले आरोग्य सांभाळले पाहिजे याबाबत विवेचन करीत प्राचीन काळापासून अनेक विद्वान पंडितांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली आणि आपण सुद्धा त्यांचा आदर्श जोपासण्याची आवश्यकता व्यक्त करीत विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमासाठी ब्लिस हॉस्पिटलचे डॉ.सुकन्या कापसे ,डॉ.सायली तापकीर ,डॉ.समीर पाटील रोडे ,डॉ.जयस हाडवळे ,डॉ.प्रिती ढमाले ,सिस्टर-शोभा काळे,सिस्टर- संगीता राठोड ,स्नेहा मसराम,मुजीब देशमुख, स्वप्नील चव्हाण ,सोनाली भोयकर व सर्व सहकारी,प्रा.संजीव कांबळे, प्रा.डॉ. छाया जोशी,प्रा. सोनाली अभंग प्रा. प्रविण डोळस, प्रा. दीपाली सोनवणे प्रा. सविता मानके, प्रा. माणिक कसाब, प्रा. शाहूराज येवते, प्रा.शैला वाळुंज,प्रा. विश्वनाथ व्यवहारे,प्रा. डॉ. रणजित कदम, प्रा. डॉ. राजू शिरसकर प्रा.प्रेरणा पाटील,प्रा. यशोदा खुळखुळे,प्रा.सोनाली अभंग,प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सोनाली तापकीर, प्रा.प्रियंका जाधव, मा. श्री. प्रवीण भावे कार्यालयीन अध्यक्ष, सौ. वर्षा ताजणे, श्री सुशेन राठोड,श्री. वैभव बडवे श्री श्रीकांत कांबळे इत्यादी सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम वर्ष बी,ए., बी.कॉम आणि बी.बी.ए (सी.ए.) या वर्गातील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे तर उपस्थितांचे आभार प्रा. कैलास अस्तरकर यांनी केले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.