शबनम न्युज | पिंपरी
एका महिन्यात पैसे तिप्पट करण्याचा माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, असे सांगून महिलेची तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १० जानेवारी, २०२१ ते सात जानेवारी २०२३ या कालावधीत माणगाव, मुळशी येथे घडली. या प्रकरणी महिलेने शनिवारी (दि. ७) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी स्वप्निल संजय ब्रहो (रा. दिघोरी, नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला एका महिन्यात पैसे तिप्पट करण्याच्या आमिष दाखविले. फिर्यादीने आरोपीकडे ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली, परंतु आरोपीने गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचा परतावा अथवा गुंतविलेले पैसे परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली असे फिर्यादीत नमूद आहे.
Advertisement