शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगावच्या १४ वर्ष मुलींच्या कबड्डी संघाने महाराष्ट्र क्रीडा संचालनालय पुरस्कृत पुणे विभागीय कबड्डी स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करीत अंतिम सामन्यात विजयी संपादन करत दि.२४/१/२०२३ ते २५/१/२०२३ दरम्यान जळगाव येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळवला आहे.
कबड्डी क्षेत्रातील या उज्वल यशासाठी दिनांक २०/१/२०२३ रोजी शाळेच्या प्रांगणात संघातील रूपाली राठोड, अंजली पौळ, डिंपल उडानशिवे , विद्या सालकमवाड, ऋतुजा चव्हाण, व्यंकाम्मा पवार, आयुष्या बारणे, भारती किरवे, कार्तिकी काकडे,लक्ष्मी माटुळकर, प्राजक्ता केदारी, मनीषा गायकवाड या खेळाडूंसह मार्गदर्शक श्री आटवे बन्सी व श्रीमती सोनाली जाधव यांचा श्रीमती अनिता केदारी, क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे शुभ हस्ते व श्री दीपक कन्हेरे क्रीडा पर्यवेक्षक, श्री बाळासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव, श्री संतोष बारणे, श्री सुदाम दुर्वे, श्रीमती सुषमा तुरुकमारे यांची उपस्थितीत ट्रॅक सूट, बॅग्स, किटस आदि साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला व सदर संघाला श्री संदीप खोत उपायुक्त माध्यमिक शिक्षण विभाग, श्री बाळासाहेब खांडेकर साहेब आयुक्त क्रीडा विभाग, श्री परशुराम वाघमोडे प्रशासन अधिकारी क्रीडा विभाग, श्री मनीष जगताप मुख्य लिपिक, श्री राजेंद्र नागपुरे ज्युनियर टेक्निशियन, श्री चंदन गंगावणे मुख्य लेखापाल, श्रीमती टिळेकर मंजुषा ,श्रीमती चौगुले अंजली ,श्रीमती राऊत हर्षदा इत्यादी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सदर संघाला श्रीमती सोनाली पाटील, श्री शैलेश खेडेकर यांचे सहकार्य लाभले आहे.