विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते आज देहूत संपन्न
शबनम न्यूज ( प्रतिनिधी ) :
देहू : पुण्यातील एडवोकेट माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनच्या पुढाकारातून कैवल्य कथा या यूट्यूब चैनल वरील संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर आधारित तिसरं पुष्प म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या गोष्टीचे ॲनिमेशन स्वरूपातील चल चित्राचे उद्घाटन विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते आज देहू येथे संत तुकाराम महाराज मंदिरात करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितले की पंढरपूर येथील विकास कामांसाठी बैठका घेत असताना मागील सरकारची खूप मदत झाली यामुळे ट्रॅक्टर कोटी रुपये शासनाने जाहीर केले होते त्याचप्रमाणे देहू येथील सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले संत तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिलेल्या शिकवणीतून 80 टक्के समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आज संत तुकाराम महाराजांच्या चरणी संत तुकाराम महाराजांच्या गोष्टी रूप ॲनिमेशन जलचित्राचे उद्घाटन झाले याचा मला आनंद आहे हे ॲनिमेशन चलचित्र जास्तीत जास्त लोकांनी पहावा सोबत त्याचं इंग्लिश हिंदी मध्ये रूपांतर व्हावं आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून याचे प्रक्षेपण झालं पाहिजे यासाठी देखील डॉक्टर नीलम गोरे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले