- इमारतींची वाढती उंची आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन
- ‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘चे आयोजन
पुणे | शबनम न्यूज
‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘च्या वतीने ‘सस्टेनेबिलिटी इन हाय राईझ’ विषयावर ४ फेब्रुवारी रोजी ग्रीन कॉन्क्लेव्ह चे आयोजन करण्यात आले आहे. सुझलॉन वन अर्थ(केशवनगर,हडपसर) येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात ही कॉन्क्लेव्ह होणार आहे. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे महासंचालक प्रशांत गिरबाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘सोसायटी ऑफ हिटिंग ,रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘च्या पुणे चॅप्टर चे अध्यक्ष वीरेंद्र बोराडे,कॉन्क्लेव्ह च्या निमंत्रक अंशुल गुजराथी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अरविंद सुरंगे,अमोल उंबरजे,आशुतोष जोशी,अमित गुळवडे,नंदकिशोर कोतकर,उल्हास वटपाल,विमल चावडा,चेतन ठाकूर,सिम्पल जैन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यात ३० मजली,५५ मजली उंच इमारतींची बांधकामे चर्चेत आहेत. आहे.निवासी इमारती,व्यावसायिक इमारती किंवा दोन्हीही असलेल्या इमारती स्मार्ट सिटी आणि इतर भागात आकाराला येणार आहेत. पुण्याची क्षितिजे उंचावणाऱ्या या इमारतींच्या बांधकामामुळे शाश्वत विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आर्किटेक्ट,सल्लागार,अभियंते ,नागरिक प्रतिनिधी असे ३०० जण या परिषदेत सहभागी होणार आहेत.
इमारतींची वाढती उंची आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन
‘डी कार्बनायझेशन ,एयर क्वालिटी,हेल्थ,प्रॉडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी’ ,स्टेकहोल्डर्स इंटरव्हेन्शन फॉर हाय राईज’,इश्युज अँड रिझॉल्युशन्स -सर्व्हिसेस इन हाय राईज’,’पावरिंग सस्टेनेबल इंडिया विथ ग्रीन फायनान्स’ अशा विषयावर चर्चासत्रे या परिषदेत आयोजित करण्यात आली आहेत.
या एक दिवसीय कॉन्क्लेव्ह मध्ये पंकज धारकर,एन एस चंद्रशेखर,आनंद चोरडिया,चेतन सिंग सोळंकी हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.डॉ केरी चॅन,केन यिंग,डॉ हरिहरन,मिली मुजुमदार,अनुजा सावंत,अरविंद सुरंगे मार्गदर्शन करणार आहेत.
मान्यवरांचा गौरव :
आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या मान्यवरांचा यावेळी विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. आनंद चोरडिया(अर्थ अवॉर्ड),सुभाष देशपांडे(वॉटर अवॉर्ड),पंकज धारकर(फायर अवॉर्ड),एन एस चंद्रशेखर(विंड अवॉर्ड),विश्वास कुलकर्णी(स्पेस अवॉर्ड),प्रदीप भार्गव (इलेमंट ऑफ सस्टेनेबिलिटी अवॉर्ड),चेतन सोळंकी(एलेमेंट ऑफ एनर्जी),शीतल भिलकर(वूमन आयकॉन अवॉर्ड) यांचा त्यात समावेश आहे.ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
फॅब्रिक सॉक्स,विप्रो,ग्राउंड ११ आर्किटेक्टस,असाही इंडिया ग्लास लि.,७५ एफ, गेब्रिट,चतुर प्रेमानंद वासवानी,प्रोलिट ऑटोग्लो यांच्या सहकार्याने ही कॉन्क्लेव्ह होत आहे. आर्किटेक्ट,इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन, एफ एस ए आय,जीबीसी आय,इन्फ्रा,ऑसम,इसले,सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज या संस्था संयोजनात सहकार्य करीत आहेत.