शबनम न्यूज | पुणे
स्व.आमदार मुक्ता टिळक आणि स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजप, मविआचा उमेदवार अद्यापही घोषित करण्यात आलेला नसून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भापज पक्षाचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार असल्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, “येत्या ६ फेब्रुवारीला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. आतापर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार” असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.