अभिनेते प्रभास, क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खान यांच्या बहुप्रतिक्षित आदीपुरुष चित्रपट 16 जून रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसातच 240 रुपये रुपयांची बंपर कमाई केली आहे. पण चित्रपटातील प्रेक्षकांकडून अतिशय वाईट रिव्यू या चित्रपटाला मिळाले आहेत. मात्र रामायणची कथा आणि प्रभास च्या स्टारडममुळे चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात जोरदार कमाई केली आहे.
चित्रपट प्रदर्शित होताच त्याच्या डायलॉग आणि व्हीएफएक्सवर जोरदार टीका झाली. पण आदीपुरुषला पहिल्याच दिवशी बंपर ओपिनिंग मिळाली. आदीपुरुष पहिल्या दिवशी जगभरात सुमारे 140 कोटी रुपयांची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला तसेच आदीपुरुषने दोन दिवसात सुमारे 240 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
Advertisement