शबनम न्यूज | पुणे
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील ९ दिव्यांग सेवकांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खास दिव्यांगांसाठी असलेल्या तीन चाकी स्कूटरचे वाटप करण्यात आले. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा व सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरुरे यांच्या हस्ते सुझुकी ॲक्सेस या तीन चाकी स्कूटरच्या चाव्या दिव्यांग सेवकांना प्रदान करण्यात आल्या. स्वारगेट मुख्यालयाच्या मध्यवर्ती यंत्रशाळेत सदरचा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र शासन निर्णय परिपत्रक दिनांक १४/०२/२०१२ अन्वये परिवहन महामंडळाकडील पात्र ९ दिव्यांग
सेवकांना तीन चाकी स्कूटरचे वाटप करण्यात आले. परिवहन महामंडळाकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे दिव्यांग सेवक भारावून गेले होते. याप्रसंगी पीएमपीएमएलचे सर्व विभाग प्रमुख, सर्व आगार व्यवस्थापक, सर्व आगार अभियंता यांच्यासह कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.
ज्या ९ दिव्यांग सेवकांना तीन चाकी स्कूटरचे वाटप करण्यात आले त्यांची नावे पुढील प्रमाणे : श्री संदीप सुदाम कुंजीर, श्री अनिल बबन रेणुसे, श्री नसिर याकुब शेख, श्री शिवलिंग सदाशिव इंगवले, श्री दिनकर शिवाजी झेंडे, श्री झारेकरी मो उमर हसन, श्री बापू तुकाराम पायाळ, श्री चैतन्य बंडोपंत नाणेकर, श्री रोहित माधव कुलकर्णी.