शबनम न्यूज | पुणे
पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १२६ अ/१ मेडिपॉइंट ते खडकी बाजार व मार्ग क्रमांक १२६ अ/२ बालेवाडी गाव ते खडकी बाजार असे दोन नवीन बसमार्ग स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या दोन नवीन बस मार्गांचे उद्घाटन पीएमपीएमएलचे संचालक तथा पुणे मनपा सभासद मा. श्री. प्रकाश ढोरे यांच्या हस्ते करण्यातआले.
यावेळी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी
श्री. चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री. सतीश गाटे, बालेवाडी आगार व्यवस्थापक श्री. दत्तात्रय माळी, टाईम कीपर श्री. मारुती बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक १२६ अ/१ मेडिपॉइंट ते खडकी बाजार या बस सेवेचा मार्ग वसुंधरा लॉन्स, डी पी रोड
कॉर्नर(जाताना), रिलायन्स मॉल (येताना),परीहार चौक, ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज बोटॅनिकल गार्डन, एल आय सी कॉलनी, डॉ. सय्यद दवाखाना, गणपती मंदिर बोपोडी, भाऊराव पाटील चौक, बोपोडी गाव, मानाजी बाग, आलेगावकर शाळा असा असेल. तर मार्ग क्रमांक १२६ अ/२ बालेवाडी गाव ते खडकी बाजार या बस सेवेचा मार्ग देसाई पोल्ट्री फार्म, चाकणकर मळा, अभ्युदय बँक, जुपिटर हॉस्पिटल, ताम्हाणे चौक, पंपिंग स्टेशन, मेडि पॉइंट वसुंधरा लॉन्स, डी पी रोड कॉर्नर(जाताना), रिलायन्स मॉल (येताना),परीहार चौक, ब्रेमेन चौक, स्पायसर कॉलेज बोटॅनिकल गार्डन, एल आय सी कॉलनी, डॉ. सय्यद दवाखाना, गणपती मंदिर बोपोडी, भाऊराव पाटील चौक, बोपोडी गाव, मानाजी बाग,
आलेगावकर शाळा असा असेल. सध्या या दोन्ही मार्गांवर दर अर्ध्या ते एक तासाला बस उपलब्ध असेल. प्रवासी संख्या व उत्पन्नात वाढ झाल्यास या दोन्ही मार्गांवर आणखी बसेस सोडल्या जातील.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,