शबनम न्यूज | पुणे
स्वारगेट मुख्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजनेची घोषणा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली. परिवहन महामंडळाच्या स्वारगेट
मुख्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. चेतना केरुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षी स्वातंत्र्य दिना दिवशी महामंडळाकडील १३ आगारांमधील प्रत्येकी एक चालक, एक वाहक, वर्कशॉप विभागातील एक कर्मचारी यांच्यासह सर्व आगारांमधून एक आगार व्यवस्थापक, एक आगार अभियंता यांना तसेच चेकर टीम व विभाग प्रमुख यांना सन्मानपत्र, रोख रकमेचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. या बक्षिसासाठी निवड करताना वर्षभरातील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.
ध्वजारोहणानंतर १८ चालक सेवकांचा व प्रशासन विभागातील १ लिपिक अशा १९ सेवकांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध हॉस्पिटल्समध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची मृत शरीरे ॲम्बुलन्स द्वारे वैकुंठधाम पर्यंत पोचवण्याचे जोखमीचे काम परिवहन महामंडळाकडील १८ चालक सेवकांनी जबाबदारीने व निष्ठेने केले याबद्दल त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
तसेच कोरोना पार्श्वभूमीवर कामकाज करीत असताना कोरोनामुळे निधन झालेल्या परिवहन महामंडळाकडील ५ कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी प्रत्येकी ५० लाख रुपयांची विमा कवचाची रक्कम मिळवून देण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले असे प्रशासन विभागातील लिपिक श्री सुरेश खोपडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आलेले चालक सेवक पुढील प्रमाणे : श्री जब्बार पटेल, श्री छगन शेळके, श्री तात्याबा हगवणे, श्री योगेश जमदाडे, श्री सुनील डोंगरे, श्री विनोद माने, श्री गणेश गर्जे, श्री सच्चिदानंद कदम, श्री सचिन खोपडे, श्री स्वप्नील गाढवे, श्री संतोष जगदाळे, श्री संजय पासंगे, श्री रामदास मेदगे, श्री विकास गागडे, श्री निरंजन ढगे, श्री प्रकाश विघ्ने, श्री संदिप बोंगाणे, श्री राजू भालेराव. प्रास्ताविक कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री सतीश गाटे यांनी केले. याप्रसंगी सर्व विभाग प्रमुख, सर्व आगार व्यवस्थापक, सर्व आगार अभियंता यांच्यासह कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.