शबनम न्युज | चाकण
चाकण शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहतूक समस्या कमी व्हावी, या हेतूने चाकण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक धीरज प्रकाश मुटके व सभापती, नगरसेवक प्रकाश राजाराम भुजबळ यांच्या सौजन्याने वाहतूक विभागाला दोन बॅटरी सह इन्वर्टर बॅकअप देण्यात आले. चाकण, पुणे, नाशिक हायवे, आंबेठाण चौक येथील वाहतूक समस्या कमी करण्यासाठी सिग्नल कायमस्वरूपी सुरू राहावे, याकरिता हे बॅकअप देण्यात आले, असल्याचे नगरसेवक धीरज मुटके व नगरसेवक प्रकाश भुजबळ यांच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र अदलिंग पोलीस अधिकारी स्वाती जाधव यांचे सहकार्य लाभले.
शहरातील वाहतूक समस्या असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सिग्नल बंद असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. ही वाहतूक सुरळीत व्हावी, याकरिता दोन बॅटरीचा इन्व्हर्टर बॅकअप देण्यात आले. याचा फायदा वाहतूक सुरळीत करण्यास मोठ्या प्रमाणात होणार आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने नगरसेवक धीरज मुटके व नगरसेवक प्रकाश भुजबळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.