शबनम न्यूज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकी करिता आता इच्छुक उमेदवारांची रांगच रांग लागली आहे. 31 जानेवारीपासून 7 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज घेऊन दाखल करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत आतापर्यंत 93 उमेदवारांनी 170 उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यापैकी आजपर्यंत 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आज चौथ्या दिवशी भाजपचे शंकर शेठ जगताप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर व काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष सायली नढे यांनी उमेदवारी अर्ज घेतले. त्यांच्यासह आज एकूण 32 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहे.
उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे –
१ श्री.संतोष किसन नवले
२ श्री.शंकर पांडुरंग जगताप
३ श्री.शंकर शिवाजी माने
४ श्री.राजेश यशवंतराव नागोसे
५ श्री.नंदू गोविंद बारणे
६ श्री.प्रविणकुमार अशोक कदम
७ श्री.श्रीकांत शहाजी गोरे
८ श्री.प्रशांत कृष्णराव शितोळे
९ श्री.मनोज मधुकर खंडागळे
१० श्री.सतीश श्रावण कांबिये
११ श्री.सुरेश एकनाथ जगधने
१२ सौ.सायली किरण नढे
१३ सौ.प्रतिमा विनोदसिंह राजे
१४ श्री.दिलीप खंडुजी पांढरकर
१५ श्री. राहुल निवृत्ती मदने
१६ श्री.भाऊसाहेब सोपानराव भोईर
१७ श्री.अॅड. मिलिंद रोहीदास कांबळे
१८ श्री.मेहुल भरत जोशी
१९ श्री.श्रीगणेश तुकाराम कदम
२० श्री.मोरेश्वर महादू भोंडवे
२१ श्री.दयानंद नानासाहेब सरवदे
२२ श्री.ज्ञानेश्वर तुळशीराम मलशेट्टी
२३ श्री.रवि रमेश नांगरे
२४ श्री. निखील दिगंबर भोईर
२५ सौ. भाग्यश्री निखील भोईर
२६ श्री. झेविअर अॅन्थोनी
२७ श्री. सचिन दत्तातत्रय धनकुडे
२८ श्री. सुहास पोपट गजरमल
२९ श्री. काटे आनंद दिपक
३० श्रीम. प्रियंका सलील कदम
३१ श्री. स्वप्नील भागीरथ बनसोडे
३२ श्रीम. राजश्री ज्ञानेश्वर कोरडे