शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव व माजी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या प्रदेश काँग्रेस सचिव पदासह प्राथमिक सदस्याचा राजीनामा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
मागील काही वर्षापासून सचिन साठे हे काँग्रेस पक्षात नाराज असल्याचे जाणवत होते त्यांनी आपल्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा वरिष्ठांवर नाराज होऊनच दिला होता त्यांच्या राजीनामामुळे शहर अध्यक्ष पद कैलास कदम यांच्याकडे गेले व सचिन साठे यांना काँग्रेस पक्षाने प्रदेश सचिव पदावर विराजमान केले परंतु शहराच्या पक्ष बांधणीकडे शहरात समस्यांकडे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष नाही अनेक वेळा तक्रार करूनही काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तक्रारीची दाखल घेत नाही यामुळे सचिन साठे हे काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज होते आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व प्रदेश काँग्रेस सचिव पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी आपल्या राजीनामा मध्ये स्पष्ट केले आहे की प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावर त्यांनी काम केले आहे तसेच पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष पदावर काम करताना प्रामाणिक व निस्वार्थीपणे काम केले मात्र नेहमी उपेक्षा होत असल्याने यापुढे काँग्रेस पक्षाचे काम करण्याची आपली मानसिकता राहिली नाही त्यामुळे स्वखुशीने आपण प्रदेश काँग्रेसचे सचिव पद व पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देत आहोत त्यांनी आपली नाराजी उघड केली असली तरी सध्या पिंपरी चिंचवड शहरात सचिन साठे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे सचिन साठे हे काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करतील असे संकेत त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळीच दिले होते.