झी मराठीवरच्या ‘देव माणूस’ या गाजलेल्या मालिकेतील सर्वात लोकप्रिय झालेली देवमाणसाची व्यतिरेखा साकारणारा अभिनेता किरण गायकवाडचा बहुचर्चित सिनेमा ‘चौक’ लवकरच सर्वत्र प्रदर्शित होतोय. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. किरणची मालिकेपेक्षा जरा वेगळी आणि भन्नाट भूमिका या सिनेमात पाहायला मिळतेय. त्यामुळे त्याला या भूमिकेत बघायला त्याचे चाहते फार उत्सुक आहेत. या चित्रपटात किरण व्यतिरिक्त प्रवीण तरडे, रमेश परदेशी, उपेंद्र लिमये, स्नेहल तरडे, शुभंकर एकबोटे, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे अशी तगडी स्टारकास्टसुद्धा आपल्याला बघायला मिळतेय. मनोरंजनाचा मसाला पुरेपूर भरलेला हा चित्रपट कधी एकदा बॉक्स ऑफिसवर येतोय आणि आम्ही तो बघतोय अशी अवस्था या दिग्गजांच्या चाहत्यांची झाली आहे.
या मुलाखतीचा पुढचा भाग लवकरच ‘आरपार’ वर प्रदर्शित होणार आहे. पुढच्या भागात ती काय खुलासे करणार आहे, ह्याची उत्सुकता सर्वत्र आहे.