शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
माजी मंत्री आमदार ॲड यशोमती ताई ठाकूर या कायमच समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात, चुकीच्या गोष्टी विरोधात नेहमीच आवाज उठवीत असतात पण काही समाजकंटक व विघ्नसंतोषी प्रवृत्तींच्या लोकांना त्रास होतो. अशा एका कैलास सुर्यवंशी नामक समाजकंटकांने आमदार ॲड यशोमती ताई ठाकूर यांना ट्विटर या समाज माध्यमातून जीव मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. सदर व्यक्तीवर पिंपरी चिंचवड शहर पोलिस सह आयुक्त डॉ संजय शिंदे यांना निवेदन देऊन सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सन्माननीय संध्याताई सव्वालाखे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली व सौ सायली किरण नढे शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वामध्ये शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी मुख्य प्रवक्ता पिं चिं महिला काँग्रेस कमिटी निगार ताई बारस्कर,स्वाती शिंदे, आशा भोसले, निर्मला खैरे, भाग्यश्री थोरवे,रंजना सौदेकर, मोनिका कोहर आदी उपस्थित होत्या.