शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
अमरावती येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे या व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीत केलेल्या अपमान कारक वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन पिंपरी चिंचवड शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष तथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे त्याचबरोबर सावता परिषद प्रदेश अध्यक्ष मयूर राजे वैद्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
त्याप्रसंगी उपस्थित सावता परिषद प्रदेश महासचिव गणेश दळवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मंडळाचे अध्यक्ष हनुमंत भाऊ माळी, कार्याध्यक्ष अनिलराव साळुंखे, सावता परिषद पिंपरी चिंचवड, शहराध्यक्ष चेतन वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंदा अण्णा कुदळे, सावता परिषद पुणे संघटक सुरज भुजबळ ,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल नाळे, पिंपरी चिंचवड शहर संघटक चैतन्य भुजबळ, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष ऋषिकेश ताम्हाणे, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख ऋषिकेश गार्डे, चेतन रासकर विभाग प्रमुख ससाने, शाम माणिकराव रासवे, सावता परिषद सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष परभणी जगदीश रासवे, तालुका अध्यक्ष सोशल मिडीया ओमकार वैरागर पंडित मुगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.