शबनम न्युज | शिरूर (वृत्तसंस्था)
शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिरूर मध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे स्पष्टच आहे.
शिरूर मध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे असणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीचा प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदारांनी त्यांना विरोध दर्शवला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोध दर्शवला. खुद आढळराव पाटील यांनी खेडला निवासस्थानी जाऊन आमदार मोहिते पाटील यांची भेट घेतली, पण विरोध कायम होता. अलीकडे ते थोडे शांत झाले आहेत. त्यातच आता बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजते. ही भेट नाराजी दूर करण्यासाठीच असलेली चर्चा आता मतदारसंघातून सुरू आहे.