शबनम न्युज | पुणे
मेघराज राजे भोसले मित्रपरिवार यांच्यावतीने रंगपंचमी निमित्त रविवारी पुण्यात मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील कलावंत यांच्यासाठी ‘रंगोत्सव कलाकारांचा २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या वतीने पुण्यातील कलाकारांसाठी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मेघराज भोसले, अभिनेत्री रमेश परदेशी, अभिनेते माधव अभ्यंकर, अभिनेते आरोह वेळणकर, एड. मंदार जोशी, अभिनेत्री तेजस्विनी पायगुडे, कुणाल निंबाळकर, अभिनेते अभिजीत बिचकुले, संदीप पाटील, त्यागराज खाडिलकर तसेच पंधराशे मराठी सिनेमा नाट्य, नृत्य, संगीत या क्षेत्रातील कलाकार, ततज्ञ, निर्माते सहभागी झाले होते.
‘रंग उत्सव कालाकारांचा २०२४’ या निमित्ताने रंगाच्या उजळणी बरोबरच कलावंतांनी लाईव्ह डीजे आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा यांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या फनी गेम चा आनंद लुटला. यावेळी मेघराज राजे भोसले मित्र परिवाराचे सदस्य अण्णा गुंजाळ यांनी सर्वांचे आभार मानले.