शबनम न्युज | पुणे
इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतपत्रिकेवर उमेदवाराचा चेहरा,नाव आणि पक्षाचे नाव असल्याने चिन्हाची आवश्यकता नाही,त्यामुळे ते हटवून चिन्ह विरहीत निवडणूक घ्यावी,अशी मागणी लोकसेना पक्षाचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार असलम इसाक बागवान यांनी केली आहे.यासंदर्भात बागवान यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना आज सोमवारी सकाळी निवेदन दिले असून दि.२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.लोकसेना पक्ष,रयत कामगार संघटना,दलित मजदूर संघटना,मुस्लिम उलेमा संघटना यांनी या मूक आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती असलम बागवान यांनी दिली.
१ मे २०१५ रोजी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मत पत्रिकेवर उमेदवाराचे फोटो लावणे निश्चित केले आहे, हा लोकतान्त्रिक आणि संविधान निर्णय आहे.पण फोटो बरोबर आता कोणत्याही आकृतीची (चिन्हाची) आता आवश्यकता नाही.कारण घटनेत पक्ष पार्टी,चिन्ह याचा कोठेही उल्लेख नाही. असे चिन्ह ठेवणे घटनाबाह्य होईल.त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मत पत्रिकेवर असलेले चिन्ह हटवावे,असे बागवान यांनी निवेदनात म्हटले आहे.