शबनम न्युज | पिंपरी
जागेच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. यामध्ये हाणामारी करून वाहनांची तोडफोड करण्यात आली. चिंबळी येथे शनिवार (दि. १३) दुपारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसा, बाळू मासाळकर, वैभव मासाळकर आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या शेजारी राहणाऱ्या संशयितांनी संगनमत करून जागेच्या कारणावरून शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेच्या मुलाच्या अंगावर धावून येत त्यांनाही मारहाण केली. फिर्यादी महिला आणि त्यांचा मुलगा घरात पळून गेला असता संशयितांनी फिर्यादी महिलेच्या चार चाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. याच्या परस्पर विरोधी पन्नास वर्षीय महिलेने फिर्याद दिली. दोन संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या जमिनीवरील बाराशे चौरस फूट जागेच्या कारणावरून संशयतांनी फिर्यादीमुळे शिवीगाळ व दम दाटी केली. फिर्यादी महिलांच्या पतीला दगडाने आणि लाकडी फळीने मारले. फिर्यादी महिला भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता, त्यांनाही शिवीगाळ दमदाटी केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.