शबनम न्युज | भोसरी
कविताताई भोंगाळे युवा मंच व सागर भैय्या गवळी युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे प्रभू श्रीराम नवमीनिमित्त दुचाकी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यास मिळाला.
भोसरी येथील चक्रपाणि वसाहत मधील प्रभू श्रीराम मंदिर इथून कामगार नेते सचिन लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीला आळंदी रोड – विदर्भ मित्र मंडळ – दिघी रोड मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पीएमटी चौक भोसरी येथे समारोप करण्यात आला.
रामनवमीनिमित्त आयोजित दुचाकी रॅलीमध्ये विविध तरुण मंडळे, पैलवान ग्रुप, ज्येष्ठ नागरिक, कामगार नेते सचिन लांडगे ,मा.नगरसेवक सागर गवळी ,माथाडी कामगार संघटना जिल्हाध्यक्ष विजय भोसुरे , उद्योजक विनायकजी भोंगाळे, पांडुरंग गवळी, रवींद्र नांदुरकर तसेच अबालवृद्ध सोबतच चिमुकल्यांचा देखील सहभाग पाहण्यास मिळाला. सकाळपासूनच शेकडो महिलांनी भगवे फेटे परिधान करून प्रभू श्रीरामाचा जयघोष करत संपूर्ण परिसर राममय झाले होते. प्रभू श्रीरामांच्या जयघोषात शेकडो दुचाकी गाड्यांसह शिस्तबद्धपणे पार पडलेली दुचाकी रॅली संपूर्ण शहराचा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.