शबनम न्यूज | पुणे
पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी शुक्रवार (दि. १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल न करता सूचकामार्फत अर्ज दाखल केला आहे.
वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर अपक्ष निवडणूक लढविणार अशा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत आपली उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर शुक्रवार (दि. १९) रोजी वंचित बहुजन आघाडी कडून पुणे मतदार संघासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Advertisement
दरम्यान, पुणे, मावळ व शिरूर या तिन्ही मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली आहे. त्यानुसार पुणे मतदार संघात गुरुवारी एक तर शुक्रवारी चार उमेदवारांची अर्ज दाखल करण्यात आले आहे.