शबनम न्युज | पुणे
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील खडकी व खडकी बाजार परिसरात रवींद्र धंगेकरांच्या पदयात्रेस खूप मोठा प्रतिसाद मिळाला. काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे, हाताच्या पंज्याच्या प्रतिकृती, ढोल ताशा आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात दिलेल्या घोषणा यामुळे खडकीचा सारा परिसर दुमदुमून गेला होता. चौका चौकात फटाक्यांच्या माळा लागत होत्या. खडकी कॅन्टॉन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद आणि पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आनंद यांनी आयोजित केलेल्या पदयात्रेत ७००-८०० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. पदयात्रेच्या दिवशीच पूजा आनंद यांचा वाढदिवस असल्याने खडकी व खडकी बाजार परिसरात चौकाचौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या माळा लावल्या व ठिकठिकाणी केक कापले गेले यावेळी महाविकास आघाडीच्या जयजयकाराच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता. खडकी कचेरीचे उद्घाटनही यावेळी केले गेले. या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बरोबर सेल्फी काढले. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या पदयात्रेत खडकी कॅन्टॉन्मेंटचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा आंनद,माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, ज्ञानेश्वर उर्फ माउली यादव, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष उदयभाऊ महाले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवाजीनगर कार्याध्यक्ष राजू साने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहर संघटक प्रशांत राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खडकी विभाग प्रमुख हेमंत यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उपविभाग प्रमुख प्रकाश चौरे, काँग्रेस खडकी ब्लॉक अध्यक्ष भगतसिंग ठाकूर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष खडकी विभाग अध्यक्ष निकित यादव, ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव,बंडू चव्हाण, प्रशांत गवळी, मनोज सूर्यवंशी, गिरीश सोनार, अजित जाधव, सुंदरताई ओव्हाळ, अक्षय शिंदे, रणजीत गायकवाड, संजय खडसे,शिवराज गुले,प्रियंका मधाळे,अशरफ तांबोळी, रोहिणी बोरसेआदी सहभागी झाले होते.