शबनम न्यूज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी काँग्रेस पक्षाने रविवारी तब्बल ३० ‘स्टार प्रचारकांची’ यादी जाहीर केली. या यादीत राहुल गांधी, प्रियंका गांधी , गुलाम नबी आझाद, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. गेहलोत, सचिन पायलट, मोहम्मद अझरुद्दीन या नावांचा समावेश आहे
या यादीत अजय कुमार लल्लू, आराधना मिश्रा “मोना”, उत्तर प्रदेश निवडणूक निरीक्षक आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि सलमान खुर्शीद यांसारख्या काँग्रेस नेत्यांच्या नावांचाही समावेश आहे. नसीमुद्दीन सिद्दीकी, आचार्य प्रमोद कृष्णम, प्रदीप जैन आदित्य, हार्दिक पटेल, इम्रान प्रतापगढ़ी, वर्षा गायकवाड, सुप्रिया श्रीनाते, तौकीर आलम, सत्यनारायण पटेल, प्रदीप नरवाल, पीएल पुनिया, राजीव शुक्ला, दीपेंद्रसिंग हुडा हे देखील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २० , २३, २७ फेब्रुवारी आणि ३ आणि ७ मार्चला सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
१० मार्चला मतमोजणी होणार आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ३१२ विधानसभा जागांवर विजय मिळवला होता. ४०३ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला ३९ .६७ टक्के मते मिळाली होती. समाजवादी पक्षाने (एसपी) ४७ जागा जिंकल्या होत्या, बसपने १९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला केवळ सात जागा जिंकता आल्या होत्या.