शबनम न्यूज | मुंबई
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. मागच्या २९ दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान लतादीदींनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क इथे लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेत्यांपासून कलाविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे परिवार देखील शिवाजी पार्कवर उपस्थित होता. राज्यपाल भगतसिंग कोशारी शिवाजी पार्क इथे उपस्थित होते.
तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रीया सुळे, पियुष गोयल, शाहरूख खान, दिग्दर्शक मधुर भंडारकर, जावेद अख्तर, आशुतोष गोवारीकर, अनुराधा पौडवाल, माजी स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर उपस्थित होते.