शबनम न्युज | पिंपरी
बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तुल आणि काडतूस जप्त केले. निगडी पोलिसांनी शनिवार (दि. 4) रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर येथे ही कारवाई केली.
मोहम्मद मेहबूब कोरबू (वय 27 , रा.निगडी )असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस अंमलदार यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे एका गॅरेज जवळ एक तरुण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती निगडी पोलिसांनी मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून मोहम्मद कोरबू याला ताब्यात घेतले. त्याची झडपी घेत त्याच्याकडे 35 लाख रुपये किमतीचे 1 पिस्तूल आणि पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Advertisement