शबनम न्युज | पुणे
वाणिज्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सेलॉन फिनसर्व या कंपनीतर्फे फिनएज २.० या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून , उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय तात्याबा भिसे उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सेलॉन फिनसर्व कंपनीतर्फे श्री.संजय भिसे यांचा सन्मानचिन्ह आणि शाल प्रदान करून गौरव करण्यात आला.
या परिषदेला संबोधित करताना , श्री. संजय भिसे म्हणाले ; दैनंदिन जीवनात आर्थिक शिस्तीचे महत्त्व अनन्यसाधारण साधारण आहे . कुटुंबाच्या गरजा पूर्ण करून , योग्य गुंतवणूक करून जवळ असलेल्या पैश्यांची वृद्धी करणे आवश्यक आहे . याच विचारधारेला पुढे घेऊन जाणारी फिनएज २.० ही परिषद पथदर्शी म्हणावी लागेल .
या परिषदेला , नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीचे डायरेक्टर श्री तरुण अग्रवाल, एचडीएफसी बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट मुकूंद मुळे , कंपनीचे संचालक संतोष सुरपूरे, राघवेंद्र बडगुजर आणि प्रशांत जोगी आदी उपस्थित होते.