( काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची एक खास मुलाखत) – रेहान सय्यद
शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांची आज आमच्या शबनम न्यूज वतीने एक खास मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत आगामी येणाऱ्या पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आले या प्रश्नांना उत्तर देताना शहराध्यक्ष सचिन साठे यांनी शहर काँग्रेस आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणुक लढविण्यास सक्षम असल्याचे ंपूर्ण आत्मविश्वासाने म्हटले आहे त्यांनी आमच्या प्रश्नांना दिलेले उत्तर पुढील प्रमाणे
प्रश्न – आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेसच्या हालचाली कशाप्रकारे सुरू आहेत?
सचिन साठे – काँग्रेसच्या हालचाली म्हणजे काँग्रेस सातत्यानं समाजाच्या सेवे मध्ये आहे, समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी सातत्याने पक्षाच्या व्यासपीठावरून मांडण्यात येतात, मग महापालिकेच्या बाबतीत असतील ,राज्य शासनाच्या बाबतीत असतील ,स्थानिक पातळीवरील जे काही प्रश्न असतील ,मग ती जिल्हाधिकार्यांकडे असू द्या ,महापालिकेचे आयुक्तांकडे असू द्या,किंवा प्रभागा मधील प्रभाग कार्यालयाच्या अधिकार्याकडे काम असू द्या आम्ही आणि आमचे कार्यकर्ते सातत्याने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असतो , विविध आंदोलन करत असतो ,शहरातील सर्व नागरिक जाणतात विविध प्रश्नावर कॉंग्रेस पक्ष कायम याठिकाणी जनतेची बाजू मांडत असतात त्यामुळे आमची तयारी ही कायमच असते , आम्ही तयारच असतो
प्रश्न- आपण शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी शहरअध्यक्ष पद अद्यापही कोणाकडे दिलेले नाही तर आगामी निवडणूक आपल्याच नेतृत्वात होणार का? काय सांगाल?
सचिन साठे – मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, हे सत्य आहे ,परंतु पक्षश्रेष्ठींनी अजून माझा राजीनामा मंजूर केला नाही ,माझा राजीनामा स्वीकारला नाही म्हणून मी पक्षाचं काम करणार नाही असं नाही, मी फक्त पदाचा राजीनामा दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, गेली पंचवीस-तीस वर्षापासून मी पक्षाचे निष्ठेने काम करत आहे त्यामुळे माझा राजीनामा जरी स्वीकारला गेला नसेल किंवा जो काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मला मान्य असेल ,परंतु तो पर्यंत पक्षाचे काम मला करायचे असा पक्षाचा मला आदेश आहे आणि त्या बाबतीत मला सांगण्यात आले आहे की तुमचा राजीनामा अजूनही स्वीकारला गेलेला नाही त्यामुळे तुम्हाला शहराध्यक्ष पदावर काम करावे लागेल , मला वेळोवेळी पक्षाचे आदेश येत असतात आंदोलने आम्ही घेतो आणि विविध कार्यक्रम पक्षाच्या वतीने आम्ही घेत असतो त्यात आम्ही कुठेही खंड पडू देत नाही…. निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठी घेतील आम्ही पक्षाचे काम थांबू देणार नाही आम्ही पक्षाचे काम सातत्याने यापुढेही सुरू ठेवणार
प्रश्न – पण येणारी निवडणूक हि आपल्याच नेतृत्वात होईल ? काय सांगाल ?
सचिन साठे – या बाबतीत आता मी काही सांगू शकत नाही, मागच्या निवडणुकीत आपण सर्वांनी पाहिलंअत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली नाही तरीही आईनं वेळेला आम्ही त्या ठिकाणी 65 उमेदवार आमचे उभे केले त्याच वेळी या शहरांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्यांना हि सगळी कडे उमेदवार देता आले नाही, कि भाजपला हि सर्व उमेदवार देता आले नाही तसेच काँग्रेस पक्षाने सुद्धा स्वबळावर निवडणूक लढविली आहे या शहरांमध्ये निश्चितच काँग्रेस ची ताकत आहे , या शहराच्या विकासामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे ,या शहरात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, गेल्यावेळी सुद्धा आमचे जे उमेदवार उभे होते त्यांना बऱ्यापैकी मते पडली ,आत्ताही महानगरपालिकेत निश्चितच काँग्रेसचा परफॉर्मन्स हा चांगला राहणार आहे
प्रश्न – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे तर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस स्वबळावर लढण्या इतपत सक्षम आहे का ?
सचिन साठे – मागच्या वेळी राष्ट्रवादी पक्षाशी आघाडी झाली नाही तरीही काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आमचे उमेदवार उभे केले, निश्चितपणे काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी सक्षम आहे आणि रिझल्ट कसा लागतो यापेक्षा त्या ठिकाणी त्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत की नाहीm वार्ड स्तरावरती mप्रत्येक ठिकाणीm आम्हाला 65 उमेदवार मागच्या वेळी उभे करता आले याचा अर्थ काँग्रेस पक्षाची ताकत निश्चितच शहरात आहे , काँग्रेस पक्ष चा जो आदेश असेल तो त्या ठिकाणी पाळायचा आणि काँग्रेस पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करायचं, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी शहरांमध्ये एक एक वार्ड मध्ये जाऊन पक्षाची बांधणी चांगल्या प्रकारे केली आहे एक एक कार्यकर्ता सर्व जाती धर्माचा या ठिकाणी जोडलेला आहे , तो निश्चितपणे काँग्रेसच्या विचारांवर आधारित विचारांशी प्रामाणिक राहून याठिकाणी आमच्याबरोबर काम करतोय त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच आपणास दिसेल , काँग्रेसची ताकद निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत वाढलेली आपणास दिसेल