शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सजी वर्की व व पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मकरध्वज यादव यांचा वाढदिवस आज वाकड मधील प्रेरणा भवन येथील अनाथाश्रमात साजरा करण्यात आला येथील अनाथाश्रमातील निराधारांना गरजेच्या व जीवनावश्यक वस्तू देऊन या दोघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे प्रमुख उपस्थित होते
प्रथम केक कापून दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या यानंतर शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते सजी वर्की व मकरध्वज यादव यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला याच वेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट वतीने कोरोना योद्धांचा सन्मान, सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला ताई सोनवणे, कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, संदेश बोर्डे , गौतम चौधरी व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.