शबनम न्युज / पिंपरी
आज रहाटणी पिपंळे सौदागर प्रभागात रहाटणी चौक ते कोकणे चौक पर्यत स्मार्ट सिटी अंतर्गत चालु असलेल्या कामांची आज माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्या समवेत पहाणी केली.
यावेळी रहाटणी चौक येथे अर्धवट असलेली ड्रेनेज लाईन व स्ट्रॅाम वॅाटर लाईन चे जोडणी चे काम लवकर पुर्ण करण्यात यावे, तसेच पावसाळा चालु झाला आहे सदर रस्त्यावर खोदकाम सुरू आहे अशात पावसाळ्यात रस्त्यावर दुर्घटना घडु नये यासाठी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात यावी अश्या सुचना देखील संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना नाना काटे यांनी दिल्या.
यापाहणी वेळी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी चे कार्यकारी अभियंता श्री. मनोज सेठीया, उपकार्यकारी अभियंता श्री. लक्ष्मीकांत कोल्हे, बी.जी शिर्के कंपनीचे सहाय्यक प्रोजेक्ट मॅनेजर श्री घाडगे आदी उपस्थित होते.