शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील भांडाराला भेट दिली आणि तेथील परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड.नितिनजी लांडगे, उप आयुक्त मनोज लोणकर, भांडारपाल रविंद्र शिलेवंत आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी महापौर माई ढोरे यांनी भांडार विभागाला साहित्य व्यवस्थित ठेवण्यात यावे,त्याचे वर्गीकरण व्यवस्थित करावे, उपलब्ध साठ्याचे वाटप नियमितपणे करावे, भंगार साहित्य तातडीने निकालात काढावे अशा सूचना दिल्या.