शबनम न्यूज / पिंपरी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार दिशा देणारे असून विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा नव्या पिढीपर्यंत पोहोचविली जात आहे असे मत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचार प्रबोधन पर्वाच्या आयोजना संदर्भात आज मुख्य प्रशासकीय इमारतीत पूर्व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष उत्तम केंदळे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, माजी नगरसेवक अंकुश कानडी, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र तायडे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, प्रा. धनंजय भिसे, डी.पी खंडारे, नितीन घोलप, संतोष जोगदंड, केशरताई लांडगे, सुधाकर वारभुवन, रमेश चिमुरकर, शिवाजी साळवे यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांनी विचार प्रबोधन पर्वाच्या संदर्भात विविध सूचना मांडल्या. यामध्ये प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमात ग्रामीण कलाकारांना संधी द्यावी, शोषित घटकातील यशस्वी खेळाडू, अधिकारी यांचा सन्मान करावा, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने योजना करुन विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करावे, विद्वान मंडळी नामवंत वक्ते यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करावे, केबल टीव्ही वर प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखविण्यात यावे, अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरु करावी, पुतळा परिसरात साहित्यसृष्टी उभारावी, स्पर्धा परीक्षा केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्र लावावे, शिल्पकार नंदकुमार इंगळे यांना पुरस्कार द्यावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुस्तके भेट स्वरुपात द्यावीत आदी सूचना बैठकीत मांडण्यात आल्या.
कोरोनाचे सावट असताना महापालिकेने ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करुन महापुरुषांच्या विचारांचा प्रसार केला असे नमूद करुन सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, सर्वसमावेशक कार्यक्रमाचे आयोजन प्रबोधन पर्वाच्या निमित्ताने केले जाईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे योजना करुन टॅब वाटप करण्याची मागणी स्विकारार्ह आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब देणार आहे ही आनंदी बाब आहे असे उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले म्हणाल्या. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
बैठकीत आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर माई ढोरे यांनी प्रशासनाला दिले. महिलांसाठी स्वतंत्र कार्यक्रम ठेवावा. कोरोना काळात नियमांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करावे. आदर्शवत प्रबोधनपर्व संपन्न होईल यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.
बैठकीत भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, देवेंद्र तायडे, प्रा. धनंजय भिसे, शिवाजी साळवे, आनंदा कुदळे, विशाल कसबे, राहूल सोनवणे, संतोष जोगदंड, दत्तू चव्हाण, अरुण जोगदंड आदींनी सूचना मांडल्या.