शबनम न्युज | पुणे
पुण्याचा गोल्डन बॉय म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सनी नानासाहेब वाघचौरे हा बिग बॉस १६ चा पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. कलर्स टी.व्ही. वरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’ चा आता १६ वा सीजन चालू आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी अत्यंत मनोरंजात्मक बनला आहे.
शो मधील स्पर्धक ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झाले असतानाच आता बिग बॉस १६ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करतील. त्यात पहिलाच स्पर्धक सनी वाघचौरे बनला आहे. सनी हा मूळचा पुण्यातील असून, तो सोशल मीडियावर ‘गोल्डन बॉय’ या नावाने प्रसिद्ध आहे सोशल मीडियावर त्याचा अनेक चाहता वर्ग आहे तशीच त्याची मोठी फॅन फॉलोविंग आहे. सनीने इंस्टाग्राम वर बिग बॉस ची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यानं लिहिलंय कि, “शेवटी स्वप्न पूर्ण झाले” बिग बॉस १६ मध्ये एंट्री होत आहे. या पोस्टला १ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. त्यामुळे आता सनीच्या एन्ट्रीनं बिग बॉस शोमध्ये रंगत येणार आहे. सनी वाघचौरे आणि बंटी गुज्जर हे गोल्डन बॉय म्हणून प्रसिद्ध आहेत. हे दोघेही पुण्याचे तरूण आहेत. सोशल मीडियावर त्यांचे जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.