शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील ज्ञानेश्वरी महिला बचत गट व चिखली अर्बन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुपौर्णिमा निमित्त महिला बचत गटातील महिलांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अश्विनी संतोष जाधव प्रमुख उपस्थित होत्या. कोलीसस ग्रीन सोसायटी मध्ये ज्ञानेश्वरी महिला बचत गट व चिखली अर्बन महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूपौर्णिमा उत्सव प्रसंगी बचत गटातील महिलांचा सत्कार नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सोसायटी मधील ज्येष्ठ सदस्य वसुंधरा यांचा 67 वा वाढदिवस ही या प्रसंगी साजरा करण्यात आला
यावेळी ज्ञानेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा जयश्री सपकाळ, उपाध्यक्ष प्रज्ञा कांबळे, खजिनदार योगिता सोनोने तसेच चिखली अर्बन महिला बचत गटाच्या अध्यक्षा निकिता पाचपांडे, उपाध्यक्ष डॉक्टर संगीता उके , खजिनदार कीर्ती मुळे ,यांच्यासह महिला बचत गटातील असंख्य महिला ज्येष्ठ उपस्थित होते